भाजपचे ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ, शिवसेना नेत्यांची नावे अजून गुलदस्त्यात!

भाजपचे ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ, शिवसेना नेत्यांची नावे अजून गुलदस्त्यात!

मुंबई – राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी 11 वाजता राजभवन येथे होणार आहे. या मंत्रिमंडळ वास्तारात शिवसेना- भाजपमधील नव्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे.भाजपाकडून कॅबिनेट मंत्रीपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे तल राज्यमंत्रीपदासाठी अनिल बोंडे, बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे हे नेते शपथ घेणार आहेत. भाजपाच्या या नेत्यांची नावे राजभवनला कळवण्यात आली आहेत. मात्र शिवसेनेची नावं अद्याप कळवण्यात आलेली नसल्याची माहिती आहे.

दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रिपदं दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिले जाणार असून जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपद तर अनिल परब, तानाजी सावंत किंवा राजेश क्षीरसागर यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच रामदास आठवले यांच्या रिपाइंलाही एक मंत्रिपद देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ फेरबदल करतांना भाजपमध्ये काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याबरोबर गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरिश आत्राम यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे सर्व मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा देतील अशी चर्चा आहे.

COMMENTS