भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराज नेत्यांचं होणार राजकीय पुनर्वसन,  पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंसह या नेत्यांकडे राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी ?

भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराज नेत्यांचं होणार राजकीय पुनर्वसन, पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंसह या नेत्यांकडे राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी ?

नवी दिल्ली – भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि संभाजी निलंगेकर यांना भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीची घोषणा झाली आहे. यात काही ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्यांची लवकरच राष्ट्रीय स्तरावर वर्णी लागणार असल्याचा अंदाज असून या सर्व नेत्यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या टीममध्ये स्थान दिले जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीची घोषणा करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेविषयी संकेत दिले होते. त्यानंतर आता ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि संभाजी निलंगेकर यांना भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS