भाजपचा नगरसेवक पिस्तूल घेऊन तुकोबांच्या पालखीत, पोलिसासोबत घातली हुज्जत !

भाजपचा नगरसेवक पिस्तूल घेऊन तुकोबांच्या पालखीत, पोलिसासोबत घातली हुज्जत !

पुणे – पुण्यातील एका भाजप नगरसेवकाने चक्क आज तुकोबांच्या पालखीत पिस्तूल बाळगून पोलिसांशी हुज्जत घातली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पिंपरी चिंचवडहून पुण्यनगरीकडे जगद्‍गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत असताना दापोडीमध्ये या भाजप नगरसेवकाने पिस्तूल घेऊन वारीत प्रवेश केला. त्याने तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्याने आपल्याजवळील पिस्तूल बाजूलाच असणा-या बॉडीगार्डकडे दिली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी या नगरसेवकाला पालखीतून बाहेर घेतले. यावेळी या नगरसेवकानं पोलिसांशीच हुज्जत घातली असल्याची माहिती आहे.

दरम्यान या भाजप नगरसेवकानं केलेल्या या कृत्यामुळे पालखीतील वारक-यामध्ये दहशतीचं वातावरण पहावयास मिळालं. वारीत पिस्तूल घेऊन आलेला नगरसेवक पाहून याठिकाणी भीतीचं वातावरण तयार निर्माण झालं होतं. दरम्यान नियम धाब्यावर बसवून शहरातील भाजपचा नगरसेवकानं वारीत पिस्तूल आणल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता या नगरसेवकानं पोलिसांसोबतही हुज्जत घातली असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS