तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक !

तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक !

यवतमाळ – वणी येथील एका भाजप नगरसेवकानं तरुणीवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीसोबत मैत्री करून पाच वर्षे अत्याचार करणारा भाजपचा नगरसेवक धीरज दिगंबर पाते (वय 29, रा. वासेकर ले-आउट) याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश सोसायटीत वास्तव्यास असलेली 22 वर्षीय तरुणीवर त्याने लैंगिक अत्याचार केले असून या तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धीरज पातेला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित तरुणीला वारंवार धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करुन  लग्नासाठी दबाव टाकला असल्याची माहिती या तरुणीने पोलिसांना दिली आहे. तसेच तिला लग्नासाठी जबरदस्ती करत कागदपत्रे मिळवून फेक फेसबुक आयडी व मतदान ओळखपत्र तयार करून नगरसेवकाने त्यावर आपल्या घराचा पत्ता टाकला. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने ही माहिती आपल्या घरच्यांना सांगितलं व त्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठले असल्याची माहिती आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

COMMENTS