बीड – महिला अधिका-याला अश्लील संदेश पाठवणारा भाजप नगरसेवक फरार !

बीड – महिला अधिका-याला अश्लील संदेश पाठवणारा भाजप नगरसेवक फरार !

बीड – केजमधील एका महिला अधिका-याला भाजप नगरसेवकानं फोनवर अश्लील मेसेज पाठवला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिला अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अश्लील मेसेज पाठवणारा नगरसेवक रवी अंधारे हा फरार झाला असल्याची माहिती आहे.

या नगरसेवकाने ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान महिला अधिकाऱ्याला तब्बल सात वेळा फोन करण्यात आले. अनोळखी क्रमांक असल्याने त्यांनी फोन घेतला नाही. पहाटे साडेपाच वाजता उठल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर सात सुटलेले कॉल दिसून आले. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना अश्लील संदेश आल्याचे दिसले.

दरम्यान कार्यालयात आल्यानंतर त्यांनी निनावी फोन करणाऱ्याचा शोध घेतला असता तो क्रमांक केज येथील भाजपचे नगरसेवक रवि अंधारे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अंधारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत केज पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS