पालकमंत्र्यांसमोरच भाजपच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

पालकमंत्र्यांसमोरच भाजपच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

भंडारा –  अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जात नसल्यामुळे  भाजपच्या एका माजी नगरसेवकानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेतच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अरुण भेदे असं या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव असून भंडारा येथे आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सरकारी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बावनकुळे यांची सभा सुरु असताना भाजपाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अरुण भेदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

दरम्यान अरुण भेदे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. भंडारा येथील भगत सिंग वॉर्डात महात्मा फुले यांचं स्मारक होणार असून स्मारकाच्या नियोजित जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण हटवावे, अशी भेदे यांची मागणी असून अतिक्रमण हटवले नाही तर आत्मदहन करु असा इशारा दिला होता. यावेळी पोलिसांनी वेळीच मध्येस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

COMMENTS