भाजपची कार्यकारिणी आज जाहीर होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?

भाजपची कार्यकारिणी आज जाहीर होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?

मुंबई – भाजपची कार्यकारिणी आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे. या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सरचिटणीस पदावर आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, सुजितसिंग ठाकूर, श्रीकांत भारतीय यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

तर भाजप नेते विनोद तावडे यांची केंद्रीय पक्ष संघटनेत वर्णी लागण्याचे संकेत आहेत. मात्र माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना यामध्ये विचार केला नसल्याची माहिती मिळत आहे. जर राज्य कार्यकारिणीतही या दिग्गजांचा विचार झाला नाही, तर भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान भाजप कार्यकारिणीत अध्यक्षानंतर महत्त्वाचं समजलं जाणारं महामंत्री अर्थात सरचिटणीसपदी कोणाची वर्णी लागते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत नाराज झालेल्या नेत्यांना किमान ही पदं तरी दिली जातात का याकडेही कार्यकर्त्यांचं लक्ष आहे.

COMMENTS