भाजप महासचिवावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप !

भाजप महासचिवावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप !

नवी दिल्ली – भाजपच्या महासचिवानं लैंगिक शोषण केला असल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. उत्तराखंडमधील भाजपचे नेते संजय कुमार यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. यबाबत संजय कुमार यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती आहे. परंतु संजय कुमार हे गेल्या पाच वर्षांपासून माझं लैंगिक शोषण करत असून पक्षातील अनेक नेत्यांकडे मी त्यांच्याविरोधात तक्रार केली. परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचं त्या महिलेने म्हटले होते. विशेष म्हणजे पीडित महिला ही भाजपामध्येच सक्रीय असल्याची माहिती आहे.

दरम्यान महिलेने आरोप केल्यानंतर संजय कुमार यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानंतर पक्षाने त्यांना पदावरुन मुक्त केले’, अशी सारवासारव भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केली आहे.

महिलेच्या आरोपानंतर संजय कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. संजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून यासाठी काँग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले आहे.

COMMENTS