काँग्रेसला धक्का देणाय्रा भाजप सरकारकडून बाळासाहेब थोरातांना दिलासा!

काँग्रेसला धक्का देणाय्रा भाजप सरकारकडून बाळासाहेब थोरातांना दिलासा!

संगमनेर – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातीलही ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडत शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही काही नेते पक्ष सोडत आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे. अशातच भाजप सरकारनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मात्र दिलासा दिला आहे. थोरात यांच्या संगमनेरच्या सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाचा ‘सहकारनिष्ठ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे थोरात यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचे राज्यातल्या सहकार चळवळीत मोठे योगदान आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते, गांधी घराण्याचे विश्वासू अशीही त्यांची ओळख आहे. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. नगरच्या विखे पाटील घराण्याचे ते कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे विखे पाटील यांना शह देण्यासाठीही काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्त्व दिलं आहे.

परंतु त्यांच्या नेतृत्वातही पक्षातील गळती मात्र थांबली नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे काँग्रेससह थोरात यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच थोरात यांच्या संगमनेरच्या सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाचा ‘सहकारनिष्ठ’ पुरस्कार जाहीर झाल्याने थोरात यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS