‘ही’ 2014 ची निवडणूक नाही, मित्रपक्षाचा भाजपला इशारा !

‘ही’ 2014 ची निवडणूक नाही, मित्रपक्षाचा भाजपला इशारा !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. 2014 च्या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी अपयश आले त्याठिकाणी आपली फळी मजबूत करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जात आहे. या पक्षांप्रमाणेच आगामी 2019 च्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांच्याही अपेक्षा वाढल्या असल्याचं दिसत आहे. बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दलामध्ये आगामी निवडणुकीच्या जागावाटपावरुन कुरबुरी वाढल्या असल्याचं दिसत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला आतापासूनच तयार करावा असा आग्रह जदयूने भाजपकडे केला आहे. परंतु भाजपनं मात्र याकडे कानाडोळा केल्यामुळे ही 2014 ची नाही तर 2019 ची निवडणूक असल्याचा इशारा भाजपनं दिला आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत सद्यपरिस्थितीचा विचार करून प्रत्येक पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या पाहिजेत असं जदयुचं म्हणणं आहे. परंतु  भाजपाला पुन्हा एकदा 2014 सारखे यश मिळवायचे असल्याने जागावाटपात त्यांच्या जास्त अपेक्षा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.त्यामुळे 2014 नव्हे तर 2019 ची निवडणूक असल्याचं जदयूनं म्हटलं आहे. 2014 चे निकष लावायचे झाल्यास भाजपने बिहारमध्ये 40 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता. या जागांचा विचार करता भाजपाला विधानसभेच्या 243 पैकी 173 जागांवर यश मिळू शकले असते. तर त्यावेळी जदयूला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. रामविलास पासवान आणि उपेंद्र सिंह कुशवाह यांच्या पक्षालाही अनुक्रमे सहा आणि तीन जागा मिळाल्या होत्या. मग आता आगामी निवडणुकीत एवढ्याच जागा लढवायच्या का, असा सवाल जदयूनं केला आहे.

COMMENTS