नारायण राणे यांची भाजपकडून कोंडी !

नारायण राणे यांची भाजपकडून कोंडी !

मुंबई – राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भाजपकडून कोंडी केली जात आहे. मंत्रिपदासाठी राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपला साथ देण्याचं ठरवलं होतं. परंतु नारायण राणे यांना भाजपनं मंत्रिपद न देता थेट राज्यसभेत पाठवलं. त्यानंतर आता राणे यांची नाणार प्रकल्पावरुन कोंडी केली जात असल्याचं दिसत आहे. कारण नारायण राणे यांचा नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला जोरदार विरोध आहे. नारायण राणे आणि शिवसेनेचा विरोध झुगारुन भाजपनं या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. त्यामुळे नारायण राणे यांची भाजपकडून कोंडी केली जात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान नाणारमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी सौदी अरेबियन कंपनीबरोबर केंद्र सरकारनं करार केला आहे. याबाबतची माहिती मिळताच नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पाला विरोध केला आहे. परंतु या प्रकल्पाबाबत भाजपच्या नेतृत्वानं राणे यांच्या विरोधाकडे कानाडोळा केला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मंत्रिपदानंतर नारायण राणे यांची नाणार प्रकल्पावरुन भाजपनं कोंडी केली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS