काँग्रेस-जेडीएसविरोधात भाजपचं उद्या आंदोलन !

काँग्रेस-जेडीएसविरोधात भाजपचं उद्या आंदोलन !

बंगळुरु – माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली उदया बंगळुरूमध्ये काँग्रेस-जेडीएसविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. काळे झेंडे घेवून भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते जेडीएस आणि काँग्रेसचा निषेध नोंदविणार आहेत. जनतेनं देखील या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आलं आहे. उद्या सकाळी ११:३० वाजता बंगळुरुमधील आनंदा राव सर्कल इथल्या गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे.

दरम्यान जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आजच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदी जी. परमेश्वर हे शवथ घेणार आहेत. तर विधानसभा सभापतीपदी काँग्रेसचे के. आर. ऱमेश कुमार घेणार आहेत. तसेच जेडीएसला मुख्यमंत्री पद आणि १२ मंत्रीपदं दिली जाणार असून  काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद आणि २२ मंत्री पद दिली जाणार आहेत. आज संध्याकाळी ४:३० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

दरम्यान या शपथविधी सोहळ्यानंतर उद्या भाजपकडून निषेध केला जाणार असून येडियुरप्पा हे काँग्रेस-जेडीएस सरकारला काळे झेंडे दाखवणार आहेत. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापणार असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS