मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 40 टक्के विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात !

मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 40 टक्के विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात !

नवी दिल्ली –  मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा नवीन फंडा पहायला मिळत आहे. या निवडणुकीत जवळपास 40 टक्के विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. 40 टक्के विद्यमान आमदारांना उमेदवारी न देता नवीन चेह-यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून हालचाली सुरु आहेत.

गुरुवारी मोदी-शहा यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील १७७ उमेदवारांची पहिली यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीत तब्बल ६३ आमदारांचा पत्ता कापण्यात आला असून त्यावरून भाजपने निदान पहिल्या यादीत तरी ३५ टक्के नवे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान गेली पंधरा वर्षांपासून याठिकाणी भाजपची सत्ता आहे. तीनही निवडणुकांत भाजपने विकासाच्या मुद्दय़ावर सत्ता कायम राखली आहे. परंतु यावेळी विकासाचा मुद्दा कामी येणार नसल्याचं भजापला दिसत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून नवे उमेदवार देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचं दिसत आहे.

दलित अत्याचारविरोधी कायद्यासंदर्भात मोदी सरकारने केलेली सुधारणा राज्यातील ब्राह्मण आणि राजपूत या भाजपच्या प्रभावी मतदारांना पचनी पडलेली नाही. त्यामुळे याचा फटका भाजपला बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात असून यावर संघ आणि भाजपकडून ब्राह्मण आणि राजपूत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आगामी निवडणुकीसाठी भाजपनं ‘अगली बार दोसो पार’ हा नारा दिला आहे. गेल्या वेळी १६३ जागा मिळाल्या होत्या, आता दोनशेहून अधिक जागा मिळवण्याचं टार्गेट भाजपनं ठेवलं आहे. त्यामुळे भाजपचा हा नारा कितपत खरा ठरतो हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.

 

COMMENTS