पुण्यात भाजपला धक्का, पाच नगरसेवकांचे पद रद्द !

पुण्यात भाजपला धक्का, पाच नगरसेवकांचे पद रद्द !

पुणे – महापालिकेत भाजपला जोरदार धक्का बसला असून भाजपच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एका आणि अपक्ष असलेल्या एका म्हणजेच एकूण सात नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. सहा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र जमा न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान यामध्ये भाजपचे कीरण जठार, ,फरझाना मेहबूब शेख, आरती सचिन कोंढरे, कविता भारत वैरागे, वर्षा भीमा साठे तसेच राष्ट्रवादीचे किशोर उर्फ बाळाभाऊ उत्तम धनकवडे आणि तांत्रिकदृष्ट्या अपक्ष मात्र, राष्ट्रवादीशी संलग्न असलेल्या इनामदार रुकसाना शमसुद्दीन, या सात नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.

दरम्यान यासंबधीचा अहवाल नगरविकास विभागाला कळवला असून ते शिक्कामोर्तब करून अंतीम आदेश जारी करतील अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

COMMENTS