भाजपमध्ये पुन्हा इन्कमिंग, राष्ट्रवादीच्या माजी खासदारांच्या बंधूंचा पक्षात प्रवेश !

भाजपमध्ये पुन्हा इन्कमिंग, राष्ट्रवादीच्या माजी खासदारांच्या बंधूंचा पक्षात प्रवेश !

कोल्हापूर – राज्यातील सत्ता मिळवण्यात भाजपला अपयश आले असले तरीही भाजपमध्ये पुन्हा इन्कमिंग सुरु झालं असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या बंधुंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. इस्लामपूरसह परिसरात महाडिक यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे महाडिक बंधूंच्या प्रवेशाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील राजकारण बदलणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारसह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीच, ते या थराला जातील असं वाटलं नव्हतं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे त्याला आज तात्काळ मदतीची गरज आहे, उधारीची मदत नको आहे. त्याला थेट कर्जमाफी द्यायला हवी होती. त्यांनी ते न करता उधारीची कर्जमाफी केली असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

COMMENTS