भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे!

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपाने जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

दरम्यान जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम ३५ अ रद्द करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

संकल्पपत्रात राम मंदिराच्या निर्मितीचा पुररुच्चार

75 वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठ स्थापन करणार

व्यवस्थापन, अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा वाढवणार

2022 पर्यंत देशातील सर्व रेल्वे लाईनचं विद्युतीकरण करणार

छोट्या दुकानदारांना पेन्शची योजना

देशाला प्रगतीपथावर नेण्याचा आमचा प्रयत्न – मोद

संकल्पपत्रातील लक्ष्य 2022 पर्यंत पूर्ण केलं जाणार- मोदी

जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार, जेथे पाण्याच्या वापरावर चर्चा केली जाणार- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील जनतेचा विश्वास वाढला आहे- राजनाथ सिंह

संकल्पपत्रातून नवा भारत साकारण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह

दहशतवाद मिटवण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल – राजनाथ सिंह

शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार, तसेच 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेंशनची सुविधा देणार- राजनाथ सिंह

1 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज नाही- राजनाथ सिंह

तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार- राजनाथ सिंह

सिटीजनशिप विधेयक लागू करणार- राजनाथ सिंह

COMMENTS