संजय राठोड प्रकरणी भाजप आक्रमक

मुंबईः पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठो़ड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते दोन आठवड्यानंतर माध्यमांसमोर आले. त्यांनी आपली भूमिका मांडत असताना समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमातून जे दाखण्यात आलंय त्यात तथ्य नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे त्यात सर्व स्पष्टचं होईल. या प्रकरणावरुन गेल्या १० दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे पोलीस चौकशी करत आहेत तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करु नका,’ अशी कळकळीची विनंती संजय राठोड यांनी केली आहे.

यावर भाजपने आक्रमक भूमिक घेतली असून ‘संजय राठोड यांनी फक्त प्रसारमाध्यमांसमोर येण्याचं नाटक केलं. वाटलं होतं ते प्रायश्चित्त घेतील, राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील. पण सत्ताच आपल्याला यातून बाहेर काढेल असा विश्वास त्यांना आहे. म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला नाही,’ अशी टीका भाजपते नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच संजय राठोड यांनी आज पोहरागड येथे गर्दी जमवली आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनची याला मूक संमती आहे असं आम्हाला वाटत आहे. पूजा चव्हाण प्रकरण हे गुलदस्त्यात आहे आणि समाजाची ढाल मंत्री पुढे करत आहे आणि बाकी मंत्रिमंडळाचा याला पाठिंबा आहे असं काहीसं आहे त्यामुळे हे गुलदस्त्यातील प्रकरण बाहेर यावं

‘संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू कसा झाला? यावर भाष्य केलंच नाही. त्यांनी सत्य लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. समोर येऊन ते प्रायश्चित्त करतील असं वाटलं होतं. त्यांनी राजीनामा दिलाच नाही. याप्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केले.

‘संबंधित मंत्री व सरकारचं वागणं संशयास्पद असून १५ दिवस समाजाच्या नागरिकांना हाताशी धरून दबाव तंत्र अवलंबल असं चित्र आहे. त्यामुळे हे सर्व अनाकलनीय व घृणास्पद असून दोषारोप सिद्ध होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे,’ असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मागणी केली.

COMMENTS