असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी, भाजप नेत्याचा सल्ला !

असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी, भाजप नेत्याचा सल्ला !

नवी दिल्ली – एमआयएम’चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी असा सल्ला भाजप नेते टी. राजा सिंग यांनी दिला आहे. ओवेसी यांना ‘भारतमाता की जय’ म्हणायचे नसेल तर त्यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी असं टी. राजा सिंग यांनी म्हटलं आहे. तसेच भारतामध्ये ‘भारतमाता की जय’ म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का?, असा सवालही त्यांनी ओवेसी यांना विचारला आहे.

 दरम्यान काही दिवसांपूर्वीच असदुद्दीन ओवेसी यांनी एका कार्यक्रमात ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजपनं निशाणा साधला आहे.’भारतामध्ये ‘भारतमाता की जय’ म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का? त्यामुळे तुमचे तुमच्या देशावर प्रेम नसेल तर देश सोडून पाकिस्तानात चालते व्हा असा सल्लाही टी राजा सिंग यांनी दिला आहे.

 

COMMENTS