भाजपच्या नेत्यानं घेतली बारामतीत जाऊन शरद पवारांची भेट !

भाजपच्या नेत्यानं घेतली बारामतीत जाऊन शरद पवारांची भेट !

बारामती –  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली आहे. या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात असून त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान शरद पवारांची भेट घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे आहेत. शेलार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीची चर्चा सध्या सुरु आहे. यादरम्यानच शेलार हे बारामतीत पोहचले असल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

दरम्यान आशिष शेलार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, शरद पवार वस्तू संग्रहालयासह शारदानगर शैक्षणिक संकुल आणि कृषी विज्ञान केंद्राचीही पाहणी केली आहे. तसेच या भेटीचं राजकीय कारण नसल्याचं बोललं जात आहे. परंतु तरीही शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या भेटीचीच चर्चा सध्या जोरदार सुरु असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS