औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला उधाण, भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला उधाण, भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजपचे सात ते आठ नगरसेवक फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तनवाणी आणि गजानन बरवाल आज ‘मातोश्री’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर तनवाणी हाती शिवबंधन बांधतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा महाविकास आघाडीने निवडणुकांना सामोरी जाण्याच्या तयारीत आहेत. मनसे आणि भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांपुढे तगड्या एमआयएमचंही आव्हान आहे. अशातच भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS