आणखी एका बहुजन नेत्याचा भाजपला रामराम

आणखी एका बहुजन नेत्याचा भाजपला रामराम

नांदेड : गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम केले. पंरतु पक्ष नेतृत्व आणि स्थानिक पातळीवर असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळलेला भाजपचा आणखी एक बहुजन नेत्याने भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  या बहुजनांचे नेत्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.

काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित भाजप नेते नागनाथ घिसेवाड  यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.  घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये काँग्रेसला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही. त्यांना तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज घिसेवाड यांच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण भोकरमध्ये पक्ष वाढीचे काम करणार असल्याचं नागनाथ घिसेवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

नागनाथ घिसेवाड यांनी तब्बल दोन वेळा भोकर विधानसभेची निवडणूक लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता. नागनाथ घिसेवाड यांनी मुंबईत जाऊन मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते आज नांदेडमध्ये परतले. नांदेडला आल्यावर काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घिसेवाड यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

COMMENTS