भाजपला मोठा धक्का, महत्त्वाचा नेता फोडण्यात काँग्रेसला यश!

भाजपला मोठा धक्का, महत्त्वाचा नेता फोडण्यात काँग्रेसला यश!

मुंबई – लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमेठीच्या भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तीने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रवी दत्त मिश्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांना भाजपचा महत्त्वाचा नेता फोडण्यात यश मिळवलं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान रवी दत्त मिश्रा हे अमेठी मतदारसंघात स्मृती इराणींचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जायचे. स्मृती इराणींचा अमेठी दौरा आणि रवी दत्त मिश्रा यांची साथ हे समीकरण नेहमीच असायचं. रवी दत्त मिश्रा यांनीच स्मृती इराणींना अमेठीत आणल्याचं बोललं जातं. रवी दत्त यापूर्वी समाजवादी पक्षाचं सरकार असतानाही मंत्रीही राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS