भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

अहमदनगर, शिर्डी – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्यातील भाजापा जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे आणि जिल्हा परीषद सदस्य किरण लहामटेसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोल्यातील मेळाव्यात या नेत्यांचा प्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यामुळे पिचड पिता पुत्र भाजपात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं अकोलेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.परंतु राष्ट्रवादीनही याठिकाणी फोडाफोडीचं राजकारण करत भाजपचे काही नेते आपल्या गळाला लावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्यातील भाजापा जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे आणि जिल्हा परीषद सदस्य किरण लहामटेसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी आता भाजप – राष्ट्रवादीत जोरदार सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS