विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळीत भाजपला धक्का, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश !

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळीत भाजपला धक्का, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश !

बीड – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी
आघाडीला मोठा धक्का बसला. राज्यात 48 पैकी 41 जागांवर भाजपनं विजय मिळवला.काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा पराभव पाहून राज्यातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. परंतु अशात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळीत भाजपला धक्का बसला असून भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत इंजेगावचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मुरलीधर दादा कराड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान कराड यांच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, रामेश्वर मुंडे दिलीप कराड अमोल कराड, माजी सरपंच राजाभाऊ कराड गुरुदत कराड, प्रल्हाद कराड, वैभव कराड, आदी नेते उपस्थित होते.यावेळी धनंजय मुंडे यांनी मुरलीधर दादा कराड यांचं राष्ट्रवादीचा दुप्पटा घालून स्वागत केलं आहे.

COMMENTS