भाजपच्या ‘या’ नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश!

भाजपच्या ‘या’ नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला असून नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये विजय घोडमारे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ते गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे नागपुरात भाजपला धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, मात्र भाजपने तेथे आपला झेंडा रोवला आहे. विजय घोडमारे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना भाजपनं उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून घोडमारे नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते आता राष्ट्रवादीकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS