भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्याची अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा!

भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्याची अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला असून  शिर्डी लोकसभा मतदार संघातुन भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपातुन बंडखोरी केली आहे. वाकचौरे यांनी अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीतुन सेनेकडुन उमेदवारी नाकारल्याने वाकचौरें हे अपक्ष म्हणुन निवडणुक लढवणार आहेत.

दरम्यान 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेची उमदेवारी करत वाकचौरेंनी  रामदास आठवलेंचा पराभव केला होता. मात्र गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातुन निवडणुक लढविल्याने वाकचौरेंचा  पराभव झाला होता.
त्यामुळे शिवसेना,काँग्रेस ,भाजपा आणि आता अपक्ष असा  वाकचौरेंचा राजकीय प्रवास सुरु झाला आहे.

भाऊसाहेब वाकचौरेंचा राजकीय प्रवास ?

भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सध्या ते भाजपमध्ये असून त्यांच्याकडे साईबाबा संस्थानचे विश्वस्तपद आहे.

वाकचौरे यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर 2014 ची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी पराभव झाला होता.

COMMENTS