भाजप नेत्यानं घेतली छगन भुजबळांची भेट, नाशिकचे पालकमंत्री व्हावेत अशी व्यक्त केली इच्छा !

भाजप नेत्यानं घेतली छगन भुजबळांची भेट, नाशिकचे पालकमंत्री व्हावेत अशी व्यक्त केली इच्छा !

नाशिक – भाजप नेत्यानं राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.छगन भुजबळ यांच्याशी माझं पक्ष विरहित नातं आहे. भुजबळ अनुभवी नेते आहेत. ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे. या भेटीत छगन भुजबळ यांना सदिच्छा दिल्या आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरीता भेट घेतली असल्याचं वसंत गीते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वसंत गीते यांनी 2009 साली मनसेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक ते जिंकलेही होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना भाजपचं प्रदेश उपाध्यक्षपद मिळालं. परंतु आता वसंत गीते यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते पुन्हा पक्षातर करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वसंत गीते यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS