एकनाथ खडसे भेटण्याआधीच भाजपच्या ‘या’ नेत्यानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

एकनाथ खडसे भेटण्याआधीच भाजपच्या ‘या’ नेत्यानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

मुंबई – भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. परंतु खडसे यांच्याआधीच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा केली, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीनंतर महाजन यांनी काही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे कामानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू शकतात. मीही आज मुख्यमंत्र्यांना भेटलो. कामासाठी भेटले तर त्यात काहीही चुकीचं नाही. तसेच एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांची लवकरच नाराजी कमी होईल. ते नेमके कोणावर नाराज आहेत हे माहिती नाही, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

COMMENTS