देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजपच्या या नेत्यानं घेतली राज ठाकरेंची भेट !

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजपच्या या नेत्यानं घेतली राज ठाकरेंची भेट !

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप आमदार  आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर  जाऊन भेट घेतली.
काल सायंकाळी 7 वाजता आशिष शेलार ‘कृष्णकुंज’वर आले होते. त्यावेळी सुमारे 1 तास राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची बैठक झाली. मनसे 9 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढत आहे. त्या अनुषंगाने या दोघांमध्ये चर्चा झाल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच म्हणजे 7 जानेवारीला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली होती. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. या भेटीनंतर आता आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात
जवळपास सुमारे 1 तास चर्चा झाली. त्यामुळे आगामी काळात भाजप-मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS