भाजप नेत्यानं घेतली सुप्रिया सुळे यांची भेट, राजकीय चर्चेला उधाण !

भाजप नेत्यानं घेतली सुप्रिया सुळे यांची भेट, राजकीय चर्चेला उधाण !

कोल्हापूर – भाजप नेत्यानं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सुप्रिया सुळ् यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेले धनंजय महाडिक हे विधानसभेपूर्वी भाजपमध्ये गेले होते. साखर कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आताही याच मुद्द्यावरून धनंजय महाडिक यांनी राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. परंतु ‘ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी होती,’ असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाडिक यांनी अचानक सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे महाडिक राष्ट्रवादीत पुनरागमन करणार का, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

COMMENTS