भाजपचा ‘हा’ नाराज नेता शरद पवारांच्या भेटीला, 6 जनपथवर बैठक!

भाजपचा ‘हा’ नाराज नेता शरद पवारांच्या भेटीला, 6 जनपथवर बैठक!

नवी दिल्ली – भाजपचा ज्येष्ठ नेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी एकनाथ खडसे पोहोचले आहेत.एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे पवारांसोबत बैठकीत काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावासहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पक्षाकडून आता काय कारवाई होते त्याची प्रतिक्षा असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.

तसेच पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु त्याच पक्षाने मला फळ काय दिले? मला पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवेगळ्या चौकशीचे आदेश दिले, कोणतेही कारण नसताना पक्षाने माझ्यावर कारवाई का केली?,
मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? असंही एकनाथ खडसे म्हणाले होते. या टीकेनंतर आज एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS