नेहरु यांच्या ऐवजी जिन्नांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते – भाजप नेता

नेहरु यांच्या ऐवजी जिन्नांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते – भाजप नेता

नवी दिल्ली – पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी मोहम्मद अली जिन्नांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते असं खळबळजनक वक्तव्य भाजप नेते गुमान सिंग डामोर यांनी केलं आहे. डामोर हे मध्यप्रदेशातील झाबुआ या मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार आहेत. झाबुआ येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान स्वातंत्र्याच्यावेळी नेहरु यांनी आग्रह केला नसता तर या देशाचे दोन तकडे झाले नसते. तसेच मोहम्मद अली जिन्ना हे एक वकील, विद्वान होते. त्यामुळे त्यावेळी जिन्ना यांना पंतप्रधान केले असते तर या देशाचे दोन तुकडे झाले नसते असं गुमान सिंग डामोर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS