शिवसेना-भाजपमधील धुसफूस उघड, भाजप जिल्हाध्यक्षाचे शिवसेना आमदारावर गंभीर आरोप!

शिवसेना-भाजपमधील धुसफूस उघड, भाजप जिल्हाध्यक्षाचे शिवसेना आमदारावर गंभीर आरोप!

परभणी – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना -भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली आहे. परभणीचे शिवसेना आमदार चोर आणि गद्दार असल्याचा आरोप परभणीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केला आहे. शिवसेना आमदार डॉ राहुल पाटील यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन चोर आणि गद्दार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जी कामं आमदारांनी केली नाहीत, त्याच श्रेय ते घेत असल्याचं आनंद भरोसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमदार डॉ राहुल पाटील हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय स्वतःच्या नावाने सर्वत्र घेत असल्याचं भरोसे यांनी म्हटलं आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे हे आमदार चोर आणि गद्दार असल्याचा गंभीर आरोप आनंद भरोसे यांनी केला आहे.आनंद भरोसे यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिवसेना भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

COMMENTS