कामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार होतात, भाजप नेत्याची वादग्रस्त पोस्ट !

कामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार होतात, भाजप नेत्याची वादग्रस्त पोस्ट !

काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी भर पत्रकार परिषदेत महिला पत्रकाराच्या गालाला हात लावला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर पुरोहित यांनी त्या महिला पत्रकाराची माफी मागितली होती. ही घटना ताजी असतानाच आता भाजपचे नेते एस व्ही. शेखर यांनी वादग्रस्त पोस्ट केली फेसबुक पोस्ट केली असून काम मिळवायचे असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. मीडिया हाऊसेसमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शय्यासोबत केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.एवढेच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘मदुराइ युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अँड द व्हर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल’ या आशयाने व्ही शेखर यांनी ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महिला पत्रकारांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर भाष्य केले आहे. तामिळनाडूतील प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे लोक तुच्छ, हीन आणि नीच दर्जाचे आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच काही चांगली माणसे आहेत. त्यांचा मी आदर करतो असेही या पोस्टमध्ये  शेखर यांनी म्हटलं आहे. एवढेच नाही तर तामिळनाडूतील प्रसारमाध्यमे फक्त ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आरोपींच्या हातात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकरणावरून गदारोळ माजला असून शेखर यांचा निषेध करण्यासाठी महिला पत्रकार भाजपा मुख्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. त्यानंतर शेखर यांनी मला तसे म्हणायचे नव्हते असं म्हणत आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टचे क्रेडिट शेखर यांनी थिरुमलइ एस नावाच्या व्यक्तीला दिले असून थिरुमलाइ हे अमेरिकेतील भाजपाचे समर्थक आहेत असही शेखर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS