भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा?

भाजपला मोठा धक्का, ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते सुरेश पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती आहे. विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी त्यांचे राजकीय मतभेद असून राणा पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याने आपण भाजप सोडत असल्याचे यापूर्वीच त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपला सोडचिठ्ठी देतील असं बोललं जात आहे. असं झालं तर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं  बोललं जात आहे.

दरम्यान एस.पी शुगरचे चेअरमन असलेले सुरेश पाटील यांचा उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. उस्मानाबादसह कळंब तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवतील अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात सुरेश पाटील अपक्ष लढणार की दुसय्रा कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS