भाजप नेत्याची जीभ घसरली, राहुल गांधींची कीड्याशी तुलना !

भाजप नेत्याची जीभ घसरली, राहुल गांधींची कीड्याशी तुलना !

नवी दिल्ली – भाजप नेत्याची जीभ घसरली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अश्विनी चौबे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकार आभाळासारखा असून विद्यमान काँग्रेसचे अध्यक्ष नालीतल्या कीड्यासारखे असल्याचं वक्तव्य चौबे यांनी केलं आहे.

दरम्यान राहुल गांधी यांना मेंटल सिजोफ्रेनियाचा आजार असून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. तसेच देशाच्या पंतप्रधानांना अपशब्द वापरणारे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष स्वतः नालीतल्या कीड्यासारखे आहेत. आणि ते स्वतःच काँग्रेसमुक्त भारत करतील अशी जोरदार टीकाही चौबे यांनी केली आहे. तसेच सरकारविरोधात उघडण्यात आलेल्या महाआघाडीतील नेत्यांना जनतेचा शाप लागला असल्यीच जोरदार टीकाही चौबे यांनी केली आहे. दरम्यान चौबे यांनी केलेल्या या खालच्या भाषेतील टीकेमुळे त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS