भाजपला धक्का, माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भाजपला धक्का, माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

नागपूर – काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप-शिवसेनेमध्ये जात आहेत. अशातच आता भाजपलाच धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विजय घोडमारेंनी भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान विजय घोडमारे हे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते पक्षावर नाराज होते.तसेच आगामी निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज असल्यामुळे घोडमारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी घोडमारे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांच्या भेटीत घोडमारेंनी तिकीटासाठी प्रयत्न केल्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS