मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप नेते एकमेकांवर भिडले ! VIDEO

मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप नेते एकमेकांवर भिडले ! VIDEO

राजस्थान – एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते मुख्यमंत्र्यांसमोरच भिडले असल्याचं पहावयास मिळालं आहे. राजस्थानमधील अलवार येथील एका कार्यक्रमादरम्यान भाजपा नेते रोहित शर्मा आणि देवी सिंह शेखावत यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासमोरच राडा केला आहे. मंचावर गैरवर्तन केल्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर भिडले असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांमधील वाद जास्तच चिघळत असल्याचं पाहून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मंचावरुन खाली उतरवले असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS