भाजपला धक्का, जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीनंतर अनेक पदाधिका-यांचा राजीनामा !

भाजपला धक्का, जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीनंतर अनेक पदाधिका-यांचा राजीनामा !

नवी दिल्ली – भाजपला जोरदार धक्का बसला असून जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे अनेक पदाधिका-यांनीही राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह शनिवारी मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्याचा दौरा करणार आहे.  परंतु शाहा यांच्या दौऱ्याआधीच याठिकाणी मोठा वाद निर्माण झाला असून भाजपाने जिल्हाध्यक्ष मनोहर सेठिया यांची पदावरुन हकालपट्टी केली असल्याची माहिती आहे. मनोहर सेठिया यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून याठिकाणी अनेक पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत.

दरम्यान सेठिया यांच्या जागी ओमप्रकाश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून सहा महिन्यांपूर्वीच मनोहर सेठिया यांना जिल्हाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मात्र सोशल मीडियावर एका तरुणीसोबतचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये राजनामा सत्र सुरु झालं असल्यामुळे मध्य प्रदेशात भाजपच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS