विधानपरिषदेत भाजपचा सभापती, तर शिवसेनेचा उपसभापती ?

विधानपरिषदेत भाजपचा सभापती, तर शिवसेनेचा उपसभापती ?

मुंबई – विधानपरिषदेतील यशानंतर भाजपकडून सभापतीपदासाठी दावा केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला उपसभापतीपद सोडण्याची तयारीही भाजपनं दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ पाचने वाढून भाजपा हा वरच्या सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. त्यामुळे भाजपकडून सभापतीपदासाठी दावा केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सध्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, काँग्रेसचे 18, भाजपचे 20 आणि शिवसेनेचे 11, शेकाप, जदयू, पीआरपी यांचे प्रत्येकी एक आणि सहा अपक्ष सदस्य आहेत. परंतु आगामी निवडणुकीत हे चित्र बदलणार असून भाजप अव्वल स्थानावर येणार आहे. त्यामुळेच आगामी काळात भाजपचा सभापती तर शिवसेनेचा उपसभापती असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS