‘या’ मतदारसंघात भाजपाला बंडखोरी रोखण्यात अपयश, माजी खासदाराचा उमेदवारी अर्ज कायम!

‘या’ मतदारसंघात भाजपाला बंडखोरी रोखण्यात अपयश, माजी खासदाराचा उमेदवारी अर्ज कायम!

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमधील काही नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही भाजपात बंडखोरी झाली आहे. माजी खासदार व भाजप बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपला बंडखोरी रोखण्यात अपयश आसं असून याचा फटका भाजपला बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. परंतु वाकचौरे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता 20 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
युती, आघाडीसह भाकप, वंचितचे उमेदवार रिंगणात आहेत.

COMMENTS