निवडणुकीच्या तोंडावर एका संपूर्ण पक्षाचा भाजपमध्ये प्रवेश!

निवडणुकीच्या तोंडावर एका संपूर्ण पक्षाचा भाजपमध्ये प्रवेश!

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाध्यक्षांसह संपूर्ण पक्षानच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ओडिसातील उत्कल भारत या पक्षाचे संस्थापक खरबेला स्वैन यांनी भाजपमध्ये घरवापसी करत त्यांच्या संपूर्ण पक्षानच भाजपात प्रवेश केला आहे.  केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थित भाजप मुख्यालयात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान स्वैन हे भाजपचे माजी खासदार असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकून स्वत: उत्कल भारत हा नवा पक्ष काढला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. मायावती, ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणेच पटनाईक यांनाही केंद्रात दुबळे सरकार हवे आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी केली आहे.

COMMENTS