लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर !

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे युती होणार की नाही हे सध्या तरी सांगता येत नाही. त्यामुळे भाजपनही लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात चाचपणी सुरु केली आहे. अशात काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमदेवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यापूर्वीच दानवे यांनी बीडमधून विद्यमान भाजप खासदार प्रितम मुंडे यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःची लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून आपण जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं दानवेंनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत शिवेसना भाजपची युती झाली नाही तर यावेळी त्यांना शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं आव्हान असणार आहे. त्याबाबत दानवेंना विचारलं असता ‘आतापर्यंत असे अनेक आलेत आणि मी त्यांना नीट केलं असल्याचं दानवेंनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना भाजप वेगवेळं लढले तर आगामी निवडणुकी दानेव विरुद्ध खोतकर असा जंगी सामना पहावयास मिळणार आहे.

तसेच लोकसभेची तयारी झाली असून 48 जागाही लढण्याची आमची तयारी असल्याचे दानवेंनी म्हटलं आहे. कोल्हापूर, हातकणंगले, सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू असून 48 मतदारसंघात विस्तारक नेमले असल्याचंही दानवेंनी म्हटलं आहे.

 

COMMENTS