भाजपचे राज्यातील ‘हे’ 6 खासदार गॅसवर !

भाजपचे राज्यातील ‘हे’ 6 खासदार गॅसवर !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदावार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दोन खासदारांची तिकीटे कापली असून
लातूरमधील सुनील गायकवाड आणि अहमदनगरमधील विद्यमाना खासदार दिलीप गांधी यांचे तिकीटे कापली आहेत. तर आणखी काही मतदारसंघाची उमेदवारी अजून जाहीर तरणे बाकी आहे. त्यामुळे भाजपचे राज्यातील 6 खासदार गॅसवर आहेत.

या उमेदवारांची नावे जाहीर

नंदूरबार – हिना गावीत
धुळे – सुभाष भामरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली – अशोक नेते
चंद्रपूर – हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दावने
भिवंडी – कपील पाटील
मुबंई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे
बीड – प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकर शृंगारे
सांगली – संजय पाटील

पहिल्या यादीत या खासदारांना तिकीट नाही

मुंबई उत्तर पूर्व – किरीट सोमय्या
जळगाव – ए टी पाटील
सोलापूर – शरद बनसोडे
पालघर – राजेंद्र गावित
दिंडोरी – हरिशचंद्र चव्हाण
पुणे – अनिल शिरोळे

दरम्यान या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करणे अजून बाकी आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना पुनेय्हा संधी मिळणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे भाजपच्या दुसय्रा यादीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS