लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप पराभूत, तीनही राज्यातली सत्ता जाणार – सर्व्हे

लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप पराभूत, तीनही राज्यातली सत्ता जाणार – सर्व्हे

दिल्ली – पाच राजातल्या विधानसभा निवडणुकीची काल निवडणूक आयोगानं घोषणा केली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तिसगड, तेलंगाणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पाच पैकी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगड या तीन राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या तीन राज्यात भाजप सत्तेवर आहे. आणि या तीनही राज्यात भाजप सत्ता गमावण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या सर्व्हेत ही माहिती पुढे आली आहे.

या तीनही राज्यात काँग्रेस सरकार बनवेल असा सर्व्हे सांगतोय. भाजपचा सर्वात मोठा परभाव राजस्थानमध्ये होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये 200 जागांपैकी काँग्रेसला तब्बल 142 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला फक्त 56 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतरांना 2 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीतही काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. काँग्रेसला तब्बल 50 टक्के मते मिळण्याचा अदंज आहे. तर भाजपला 34 आणि इतरांना 16 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

छत्तिसगडमध्ये मायावती आणि अजित जोगी यांच्या छत्तिसगड जनतंत्र काँग्रेस आघाडीचा फटका काँग्रेसला काही प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. मात्र तरीही सत्ता काँग्रेस काबिज करेल असा अंदाज आहे. एकूण 90 जागांपैकी 47 जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे. तर भाजपला 40 जागा जिंकण्याचा अदाज आहे. इतरांच्या खात्यात 3 जागा जाऊ शकतात. काठावरचं बहुमत मिळवणा-या काँग्रेसला छत्तिसगडमध्ये फक्त 0.3 टक्के जास्तीचं मतदान होण्याची शक्यता आहे. भाजपला 38.6 टक्के, तर काँग्रेसला 38.9 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना तब्बल 22.5 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेशमध्येही सत्ता बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला 122 तर भाजपला 108 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इथे मात्र इतर पक्षांना एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेसला इथं 42.2 टक्के, भाजपला 41.5 टक्के तर इतरांना 16.4 टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2013 मध्ये या तीनही राज्यात भाजपनं मोठा विजय मिळवला होता. तिथूनच काँग्रेसच्या पराभवाची मालिका सुरू झाली होती. त्याच्या उलटी परस्थिती आता होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

COMMENTS