भाजपकडून  महादेव जानकर यांना बारामतीतून उमेदवारी ?

भाजपकडून महादेव जानकर यांना बारामतीतून उमेदवारी ?

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेना – भाजप युतीतर्फे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु जानकर यांनी ‘कमळ’ चिन्हावर लढावे यासाठी युतीच्या नेत्यांचा आग्रह आहे.

दरम्यान महादेव जानकर, राजू शेट्टी हे चौथी आघाडी स्थापन करणार असल्याचं बोललं जात होतं परंतु महादेव जानकर यांनी युतीलाच पसंती दिली असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीने या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच याठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून नवनाथ पडळकर रिंगणात उतरत आहेत. पडळकर हे जानकर यांच्याप्रमाणे धनगर समाजाचे असल्यामुळे धनगर समाजाची मते विभागली जाण्याची शक्यता आहे. परंतु तरीही जानकर आणि सुप्रिया सुळे यांच्यात काँटे की टक्कर होऊ शकते अशी शक्यता आहे.

COMMENTS