लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी, राज्यातील ‘या’ नेत्यांची उमेदवारी निश्चित ?

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी, राज्यातील ‘या’ नेत्यांची उमेदवारी निश्चित ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनंतर भाजपची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील काही नेत्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे.
भाजपच्या या नेत्यांना उमेदवारी ?

नागपूर -नितीन गडकरी
चंद्रपूर – हंसराज अहीर
जालना – रावसाहेब दानवे
अकोला – संजय धोत्रे
भिवंडी – कपिल पाटील
गडचिरोली – अशोक नेते
या नेत्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच ही यादी उद्यापर्यंत जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जालन्यात रावसाहेब दानवेंनाच उमेदवारी
जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये मोठा तिढा निर्माण झाला होता. परंतु हा तिढा सोडवण्यात आला असून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
भिवंडीतून पुन्हा कपिल पाटील
भिवंडीतून भाजपकडून पुन्हा कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भिवंडीतील स्थानिक शिवसेना कार्यकर्ते आणि केबल ऑपरेटर्सकडून कपिल पाटील यांना विरोध करण्यात आला होता. परंतु तरीही याठिकाणी भाजपने पुन्हा एकदा भिवंडीतून कपिल पाटील यांना संधी दिली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS