“शेतक-यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार !”

“शेतक-यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार !”

अमरावती – राज्यातील शेतक-यांच्या स्वाभिमानासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य आमदार बच्चू कडून यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ संबोधलं होतं. या विधानामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे, त्यांच्या जाहीर अपमानाचा बदला म्हणून आपण ही निवडणूक लढवावी, असं जालन्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचं मत आहे, त्यामुळे आपण रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचं बच्चू कडून यांनी म्हटलं आहे. ते आमरावतीमध्ये बोलत होते.

दरम्यान बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूर मतदारसंघाचे आमदार असून ते प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आतापर्यंत त्यांनी मतदारसंघातील आणि राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रयत्न केले आहेत. अनेकवेळा त्यांनी शेतक-यांसाठी आक्रमक भूमिका घेऊन उपोषणे आणि आंदोलनं केली आहे. काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांना साले असं संबोधलं होतं. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी आपण दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS