राज ठाकरे यांच्यासमोर भाजपचे महापौर नतमस्तक !

राज ठाकरे यांच्यासमोर भाजपचे महापौर नतमस्तक !

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर भाजपचे महापौर नतमस्तक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पिंपरी-चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी राज ठाकरे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. आज एका कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे हे पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी राहुल जाधव यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांनी राजकारणाची सुरुवात ही मनसेपासून केली आहे. मनसेची स्थापना झाली त्यावेळी राहुल जाधव यांनी 2012 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. यामध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2017 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व ते या निवडणुकीतही निवडून आले. यानंतर काही दिवसापूर्वीच ते महापौरपदावर विराजमान झाले असून महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेच्या एका नगरसेवकानं त्यांनाच मतदान केलं होतं. त्यामुळे त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेऊन आपलं मनसेवरील प्रेम दाखवून दिलं आहे.

COMMENTS