दिल्लीत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा !

दिल्लीत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप सरकारविरोधात विरोधकांकडून आंदोलनं केली जात आहेत. राज्यात काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रेचं आयोजन केलं आहे. तसेच वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरांविरोधात काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली आहे. अशातच आता भाजपनंही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात या बैठकीला सुरुवात झाली असून ही बैठक आज आणि उद्या होणार आहे.

दरम्यान भाजपच्या या दोन दिवसीय बैठकीला देशभरातील पदाधिका-यांनी उपस्थिती लावली आहे. या बैठकीच्या सुरुवातीचं भाषण भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे करणार आहेत. तर समारोपाचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. दरम्यान ऍट्रॉसीटी कायद्याबाबत दलितांनी काही दिवसांपूर्वीच देशभरात जोरदार आंदोलन केलं. होतं. तसेच विरोधकांनीही संविधान बचावचा नारा दिला होता. त्यामुळे भाजप सरकारवर दलित समुदाय नाराज असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दलितांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे गैरसमज दूर करण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच या बैठकीदरम्यान ऍट्रॉसीटी कायद्याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

 

 

COMMENTS